‘राष्ट्रवादी’चा जन्म केवळ सत्तेपोटी !

By Admin | Updated: October 12, 2014 23:30 IST2014-10-12T22:13:39+5:302014-10-12T23:30:37+5:30

ढेबेवाडी : पृथ्वीराज चव्हाणांची पवारांवर कडाडून टीका

'Nationalist' only birth! | ‘राष्ट्रवादी’चा जन्म केवळ सत्तेपोटी !

‘राष्ट्रवादी’चा जन्म केवळ सत्तेपोटी !

सणबूर : ‘राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षेतून जन्माला आला. शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे होते, अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे़ केंद्रात सत्ता असणाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी युती तुटली त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीने आघाडी तोडली़,’ अशी टीका पृथ्वीेराज चव्हाण यांनी केली.पाटण विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार हिंदुराव पाटील यांच्या प्रचारार्थ ढेबेवाडी येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते़ आमदार आनंदराव पाटील, हिंदुराव पाटील, अ‍ॅड़ सुरेश कुराडे, राहुल चव्हाण, प्रकाश पाटील, राहुल पाटील, तालुकाध्यक्ष आऱ बी़ पाटील, वंदनाताई आचरे, मधुकर पाटील, धोंडिराम परीट, मंदाकिनी पाटील, सुनंदा पाटील, प्रकाश वास्के, शालन जाधव उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Nationalist' only birth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.