कोरेगावात राष्ट्रवादीची सत्ता

By Admin | Updated: August 19, 2015 23:10 IST2015-08-19T23:10:23+5:302015-08-19T23:10:23+5:30

बाजार समिती : ‘माण’मध्ये ९७ % मतदान; आज निकाल

Nationalist Congress in Koregaon | कोरेगावात राष्ट्रवादीची सत्ता

कोरेगावात राष्ट्रवादीची सत्ता

कोरेगाव/दहिवडी : कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली. व्यापारी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव कदम हे विजयी झाले. दरम्यान, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी बुधवारी ९७.५२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी होणार आहे. पणन मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तानाजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. यावेळी काँग्रेसचा विरोध असतानादेखील एकहाती सत्ता आणून राष्ट्रवादीने तालुक्यावर वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. व्यापारी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव कदम हे विजयी झाले. उर्वरित सर्वच मतदारसंघांत सुमारे ३०० ते ४०० मतांच्या फरकाने राष्ट्रवादीने विजय संपादन केला.
निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी जल्लोष करीत बाजार समिती आवारापासून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली.
माण बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९७.५२ टक्के मतदान झाले. कृषी प्रक्रियामधील एक जागा रिक्त, तर तोलाईमधील एक जागा बिनविरोध झाली होती. उरलेल्या १७ जागांसाठी बुधवारी माण तालुक्यातील सहा मतदान केंद्रांवर २०५६ पैकी २००६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१७ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्या दोन पॅनेलमध्येच ही लढत आहे. तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचा गुलाल
कोरेगाव : कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. यावेळेस काँग्रेसचा विरोध असताना देखील एकहाती सत्ता आणून राष्ट्रवादीने तालुक्यावर वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. / वृत्त २

Web Title: Nationalist Congress in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.