अर्ज छाननीत राष्ट्रवादीला फटका..

By Admin | Updated: March 25, 2016 00:04 IST2016-03-24T22:24:42+5:302016-03-25T00:04:47+5:30

लोणंद नगरपंचायत निवडणूक : १७ जागांसाठी १०६ जण रिंगणात; सर्वच पक्षांनी लावली ताकद पणाला--लोणंदचं रणकंदन

Nationalist attack filing application. | अर्ज छाननीत राष्ट्रवादीला फटका..

अर्ज छाननीत राष्ट्रवादीला फटका..

लोणंद : लोणंद नगरपंचायतीची पहिली पंचवार्षिक निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज छाननीमध्ये १९ अर्ज बाद झाले आहेत. आता १७ जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, अर्ज छाननीमध्ये माजी सरपंच व विद्यमान सदस्या नंदाताई गायकवाड, दादासाहेब ठोंबरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोणंद नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. एप्रिल महिन्यात नगपंचायतीसाठी प्रथमच मतदान होत आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बुधवारी अर्ज छाननी झाली. ११७ उमेदवारांनी १३९ अर्ज दाखल केले होते. या छाननीत १९ अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये दुबार अर्ज १४ असल्याने १७ जागांसाठी आता १०६ उमेदवार रिंगणात असल्याचे सध्यातरी दिसत आहे.
या निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून राजेंद्र क्षीरसागर यांनी सर्व प्रभागातील उमेदवारांना बोलावून अर्जाची शहानिशा करून निर्णय दिला. माजी सरपंच व विद्यमान सदस्या नंदाताई गायकवाड, दादासाहेब ठोंबरे यांच्यासह जयश्री गुंडगे असे मिळून राष्ट्रवादीच्या तिघांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्याचबरोबर प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जमातीचा राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करून राष्ट्रवादीला १७ जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे.
लोणंद नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दिवसेंदिवस येथील राजकीय वातावरण तापत आहे. ग्रामपंचायतीनंतर अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत निवडणुकीत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. येथील निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Nationalist attack filing application.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.