शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

उदयनराजेंपेक्षा नरेंद्र पाटील यांचा खर्च मोठा; प्रचारावर खर्च केली 'इतकी' रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 7:53 PM

सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक

सागर गुजर।सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र्र पाटील यांचा निवडणूक खर्च राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा जास्त झाला आहे. पाटील यांनी ६४ लाख ९७ हजार १३९ रुपये तर खासदार उदयनराजे भोसले यांनी ५९ लाख ६८ हजार ८०७ रुपये निवडणूक खर्च केला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त खर्च करूनही पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांकडून खर्च मागवून घेतला होता. खर्चाचा अंतिम तपशील जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फेराज्य निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या निवडणुकीत शैलेंद्र वीर यांनी १५ लाख २१ हजार ७८४ रुपये खर्च केला. वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांनी ६ लाख ६३ हजार १३७ रुपये, पंजाबराव पाटील यांनी २ लाख ९२ हजार ६४५, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे यांनी ८६ हजार ३१०, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप यांनी १ लाख ६८ हजार ८२२, अभिजित बिचुकले यांनी १७ हजार ३२५, सागर भिसे यांनी १४ हजार ४२५ रुपये खर्च केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप यांच्या महायुतीतर्फे जोरदार प्रचार करण्यात आला. महायुतीने सातारा लोकसभा मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची बनवली होती. तर राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोर लावण्यातआला होता.

प्रचाराचे आधुनिक साहित्य, प्रचाराची वाहने, कार्यकर्त्यांसाठी जेवणावळ्या, प्रचारफेऱ्या, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रॅली यासाठी मोठा खर्च करून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले.निवडणुकीत नरेंद्र पाटील बाजी पालटणार, शिवसेनेचा भगवा २0 वर्षांनंतर पुन्हा साताºयात फडकणार, अशा चर्चेला ऊत आला होता. मात्र ही चर्चा सपशेल फोल ठरली. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले ५ लाख ७९ हजार २६ मते मिळवून विजयी झाले तर ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळविणाºया नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला होता.नऊ उमेदवारांचा १५ कोटींपेक्षा जास्त खर्चलोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा देण्यात आली होती. नऊपैकी एकाही उमेदवाराने ही मर्यादा ओलांडलेली नाही. सर्व उमेदवारांचा निवडणुकीतील एकूण खर्च १५ कोटी २ लाख ३० हजार ३९४ रुपये इतका झाला आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक