शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:31 IST

किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

सातारा : किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे ४० जवान पुलवामात ठार केले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा. देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावध राहिला तर लोकांचं जीणं हराम होईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राज म्हणाले, पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले.नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशात हुकूमशाही आणू पाहत आहेत. लोकांना गुलाम म्हणून त्यांना वागवायचे आहे. देशात मोदी आणि शहा यांची हिटलरशाही आणू द्यायची नसेल तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना राजकीय मदत होऊ द्यायची नाही. तसेच त्यांना मदत करतील, अशा लोकांच्या पाठीशीही राहायचे नाही, असे आवाहनही ठाकरे यांनी शेवटी केले.बेसावध राहिल्यानेच महाराष्टÑ अंधारातमोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठविणारा महाराष्ट्र होता. ब्रिटिशांविरोधात आवाज उठविणाराही महाराष्ट्र होता. मग, मोदी आणि शहांविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?, असा सवाल करतानाच राजा रामदेवराय यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करू शकतात, असेही राज ठाकरे म्हणाले.आमदार परिचारकांवर कारवाई का नाहीभारतीय जनता पार्टीचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द काढतो, तरीही भाजप त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. त्याची आमदारकी कायम राहते आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की, व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही त्यांची जवानांबद्दलची आस्था आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.>पोलिसांसमोर पैसे वाटले जाताहेतनिवडणुकीमध्ये भाजपचे लोक खुलेआम पोलिसांसमोर पैसे वाटत असल्याचा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिसांना नोकरी जाण्याची भीती असल्याने तेही कारवाई करत नाहीत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.>आरडीएक्स आले कुठून?पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात तब्बल ४० जवान मारले गेले. या हल्ल्यासाठी आरडीएक्स वापरले गेले होते. हे आरडीएक्स आले कुठून? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हानही राज ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019satara-pcसातारा