शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नांदोशीची गळकी शाळा टाकणार कात.. दुरुस्तीसाठी दीड लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:15 IST

खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताची दखल; सभापती, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी-लोकमतचा प्रभाव

औंध : खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे व गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शाळेची पाहणी करून छत दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.

नांदोशी ग्रामस्थांनी चारवेळा छत दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला होता; परंतु त्यास यश मिळाले नव्हते. पावसामुळे वर्गात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर शाळेची दुरवस्था व ग्रामस्थ तसेच पालकांच्या भावना ‘लोकमत’च्या माध्यमातून मांडल्या गेल्या. या वृत्ताची प्रशासनाच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली.सभापती संदीप मांडवे यांच्या गणातील हे गाव असून त्यांनी स्वत:, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी सुजाता घाडगे यांच्या समवेत वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली.पालक, ग्रामस्थांमधून समाधानया शाळेच्या छत दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदोशीशाळेतील विद्यार्थ्यांना इमारतीच्या छताची दुरुस्ती झाल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त  होत आहे.

नांदोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सभापती संदीप मांडवे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सुजाता घाडगे यांच्यासह अधिकाºयांनी पाहणी केली. 

नांदोशी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरवस्थेची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. शाळेच्या छत दुरुस्तीबरोबर आणखी काही भौतिक सुविधा देता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे.- संदीप मांडवे, सभापतीपंचायत समिती खटाव

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळाzpजिल्हा परिषद