तोंडाला मास्क नावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:58+5:302021-01-15T04:32:58+5:30

सातारा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने साताऱ्याची बाजारपेठ फुलली होती. त्यामुळे मोतीचौक ते पाचशे एक पाटी चौक दरम्यान मोठी गर्दी झाली ...

Named the mouth mask | तोंडाला मास्क नावाला

तोंडाला मास्क नावाला

सातारा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने साताऱ्याची बाजारपेठ फुलली होती. त्यामुळे मोतीचौक ते पाचशे एक पाटी चौक दरम्यान मोठी गर्दी झाली होती. लोक मास्कचा वापर करणे जवळजवळ विसरले होते. अनेकांचे मास्क हनुवटीला लावले होते. मोती चौकात पोलीस पाहिल्यानंतर मास्क लावले जात होते.

००००००००

संत्र्यांना मागणी वाढली

सातारा : साताऱ्याच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून संत्र्यांची आवक मंदावली आहे. राजवाडा, बसस्थानक परिसरात तुरळक प्रमाणात संत्रे विक्रीसाठी येत असले तरी त्यांना मागणी कायम आहे. सरासरी आठ ते ऐंशी रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. थंडीच्या हंगामात त्यांना मागणी टिकून असते.

००००००

हिरवी केळी बाजारात

सातारा : साताऱ्याच्या बाजारात केळीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते; मात्र अनेक व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या केळीचे देठ हिरवे असून केळीच तेवढी पिकलेली आहेत. त्यामुळे ही केळी कृत्रिम पद्धतीने पिकवली तर जात नाहीत ना? असा प्रश्न पडत आहे.

००००००००

वाहनांच्या रांगा कमी

सातारा : जिल्ह्यातील सर्वच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा कमी झाल्याचे अनुभवास मिळत आहेत. पूर्वी वाहनांची वर्दळ वाढलेली असायची. कोरोनामुळे नागरिकही खरोखरच गरज असेल तरच बाहेरगावी जातात. त्यामुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी झाली.

००००००००

तोफा थंडावल्या तरी घरोघरी प्रचार सुरू

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा चांगलीच रंगत आली होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान होत असल्याने प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत; मात्र आता रात्री गुप्त बैठका, घरभेटी देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात होत्या. त्यामुळे रात्रभर कार्यकर्ते कामाला लागले होते.

००००००००००

उकाड्यात वाढ

सातारा : साताऱ्यासह परिसरातून थंडीचे प्रमाण कमी झाले असून उकाडा जाणवायला लागला आहे. आताशी मकरसंक्रांत झाली. शक्यतो होळीपर्यंत थंडी असते. मात्र यंदा लवकरच उकाडा जाणवत आहे. अनेकांच्या घरात, कार्यालयात पंखे सुरू ठेवावे लागतात.

०००००००००

तरसामुळे भीती

सातारा : सातारा ते वर्ये मार्गे पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी रात्री उशिरा तरसांचे दर्शन घडले होते. हे तरस मोटरसायकलचा पाठलाग करत असल्याची चर्चा सुरू असल्याने दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

००००००००

पदपथ असतानाही ग्रेड सेपरेटरमधून विद्यार्थी

सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण करण्यात आले आहे. याची सातारकरांना उत्सुकता असल्याने अनेकजण रात्री दुचाकीवरुन फेरफटका मारत असतात. रयत शिक्षण संस्थेसमोर पदपथ असतानाही काही विद्यार्थी भुयारी मार्गातून चालत जात असतात. ग्रेड सेपरेटरमधील डांबरीकरण चांगले झाले असल्याने गाड्या सुसाट धावत असतात. त्यातच ही मुलं चालत जातात. एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना अपघात होण्याचा धोका संभवत असतो.

Web Title: Named the mouth mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.