स्वागत कमानीला यशवंतराव चव्हाण नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:54+5:302021-04-06T04:38:54+5:30
कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटच्या जवळ बांधलेल्या कमानीस दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या, अशी ...

स्वागत कमानीला यशवंतराव चव्हाण नाव द्या
कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटच्या जवळ बांधलेल्या कमानीस दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्या, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटच्या ४ नंबर गेटला स्वागत कमान उभी करण्यात आलेली आहे. कऱ्हाडची ओळख महाराष्ट्रात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून आहे. यशवंतराव चव्हाण यांची नुकतीच जन्मशताब्दी झाली. शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. कऱ्हाडच्या विकासात त्यांचा सिंहांचा वाटा आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधव व शेतकरी संघटनांची व कऱ्हाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून या कमानीस यशवंतराव चव्हाण साहेब प्रवेशद्वार हे नाव देण्याची मागणी आहे .तरी या बाबतीत कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करणार आहे.