राजाच्या समाधीने गावाचे नाव झाले राजापूर
By Admin | Updated: April 3, 2015 00:43 IST2015-04-02T23:19:31+5:302015-04-03T00:43:43+5:30
घाटगे सरदार घराणे संस्थानिक : अंबोजीराजे घाटगे यांनी वसवले गाव

राजाच्या समाधीने गावाचे नाव झाले राजापूर
विशाल सूर्यवंशी -बुध बुधपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या राजापूरचा नावातच त्याचा इतिहास दडला आहे. बुध गाव हे संस्थानिक गाव घाटगे या सरदर घराण्याचा अठराव्या शतकात मोठ्या प्रमाणात दबदबा होता़ महादजी शिंदे यांच्या बरोबरीने आपला पराक्रम दाखवणारे राजे अंबोजीराजे घाटगे यांनी आपल्या निवृत्तीच्या काळात राजापूर हे गाव वसवले अंबोजीराजे यांच्या निधनानंतर त्यांना जानुबाईच्या मंदिर परिसरात दफन केले. ही जागा म्हणजेच आजचे खटाव तालुक्यातील राजापूर.
अंबोजीराजेंनी तीन एकरात भव्य असा तीन मजली राजवाडा बांधला परिसरातील जंगल तोडून मोठ्या प्रमाणात शेती पिकवण्यासाठी जमीन तयार केली, ही जमीन कसण्याठी माळी समाजातील कुटंबे आणून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. आजही मोठ्या प्रमाणात राजापूरला माळी समाज पाहायला मिळतोय. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला माळी समाज आज समृद्ध आहे, शेतीची राखण करण्यासाठी काटक रामोशी समाज दिमतीला असत. हा रामोशी समाज आजही या ठिकाणी पाहायाला मिळतोय. अनेक शिवारं या ठिकाणी आजही पाहयाला मिळत आहेमहादेव दरा,जरांबी, खुरीचा, नवामळा, डंगार वाडा यासारख्या अनेक शिवार, वस्त्या पाहायाला मिळत आहे.अंबोजीराजेंनी पाण्याच्या चार विहिरी कढल्या अत्यंत उत्कष्ट बांधणीचा नमुना असलेल्या विहिरी आजही सुस्थितीत आहेत, राजवाड्यासमोर ग्रामदैवत जानुबाईचे प्रचंड असे काळ््या पाषाणातील मंदिर आजही त्या काळाची भव्यता सांगत अखंडपणे उभे आहे. आपले कर्तृत्व करून ज्यावेळी अंबोजीराजेंचे निधन झाले. त्यावेळी त्यांना जानुबाई मंदिर परिसरात त्यांना दफन करण्यात आले व त्यावर समाधी बांधली; पण त्याकाळातील ‘राजाला पुरले’ असेच या भागाला संबोधित असत; पण कालांतरांना ‘राजाला पुरले’ चे राजापूर झाले. माळी, रामोशी कोष्टी, मराठा असे अनेक समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.अंबोजीराजेंचा राजवाडा अजूनही सुस्थितीत असून आतील बांधकाम ढासळल्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे .