कऱ्हाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा जिल्ह्याचे नाते सर्वश्रुत आहे. डॉ. आंबेडकर यांचे साताऱ्यात बालपण गेले आहे. ज्या महामानवाचा ‘नॉलेज ऑफ सिम्बॉल’ म्हणून जगभर गौरव केला जातो, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातारा येथे होणाऱ्या मेडिकल कॉलेजला द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्ह्याला वारसा आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर, त्यांच्या नावांवर जिल्ह्याचे नाव घेऊन अनेक वचने घेतली जातात. त्यामुळे आंबेडकर यांचे नाव सातारा मेडिकल कॉलेजला द्यावे. निवेदनावर तालुका अध्यक्ष मुकुंद माने, शहराध्यक्ष संजय कांबळे, मलकापूर अध्यक्ष रामचंद्र खिलारे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
मेडिकल कॉलेजला आंबेडकरांचे नाव द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST