नमस्कार.. मी सारिका जाधव बोलतेय..!

By Admin | Updated: June 27, 2016 00:38 IST2016-06-26T23:07:31+5:302016-06-27T00:38:56+5:30

अखेरीस नियतीने डाव साधला आणि डोळ्याच्या वाटेने ताप बाहेर पडला. सारिकाच्या नशिबी कायमचे अंधत्व देऊन गेला.जाधव दाम्पत्याने धीर सोडला नाही.

Namaskar .. I speak Sarika Jadhav ..! | नमस्कार.. मी सारिका जाधव बोलतेय..!

नमस्कार.. मी सारिका जाधव बोलतेय..!

साहिल शहा --कोरेगाव  तापाचे निमित्त झालं अन् बालपणीच दृष्टी हिरावून बसलेल्या सारिका जाधव यांनी केवळ अंधत्वावर नव्हे, तर समाजातील डोळसपणावर मात करत यश मिळविले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये त्या फोन ड्यूटी करत आहेत.निसर्गाने अन्याय केला असला तरी रडत बसणं त्यांना ठावूकच नाही. महाविद्यालयात टेलिफोन आॅपरेटरचे काम करत इतर कामे आणि संसारातील सर्व कामे एकट्या करतात. त्यासाठी कोणाच्या मदतीची गरज पडत नाही. सारिका अवघी पाच वर्षांची असताना अचानक तापाने फणफणली. गाव आणि शहरात औषधोपचार केले; मात्र ताप काही कमी होत नव्हता. अखेरीस नियतीने डाव साधला आणि डोळ्याच्या वाटेने ताप बाहेर पडला. सारिकाच्या नशिबी कायमचे अंधत्व देऊन गेला.जाधव दाम्पत्याने धीर सोडला नाही. त्यांनी काही करून सारिका हिला शिकविण्याचा पण केला. त्यांनी साताऱ्याच्या सत्यशोध संस्थेची वाट चोखळली. हेमा सोनी आणि वाघमारे यांनी त्यांना धीर दिला. सारिकाची भेट घेऊन प्रोत्साहन दिले. सारिका यांनी जळगावमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण ब्रेल लिपीसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर घेतले.दहावी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर तिने रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अकरावीचे शिक्षण पूर्ण केले आणि ‘सत्यशोध’च्या मदतीने रयत शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी पत्कारली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कॉलेजवर नेमणूक झाली.
पुढे नात्यातीलच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि पायात नकळत अपंगत्व असलेला शेतकरी अनिल बोराडे जुन्नर तालुक्यातील पारगाव येथील स्थळाचा शोध लावला. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि नवरा-नवरीची पसंती झाल्यावर विवाह झाला. कन्यारत्न झाल्यानंतर सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सारिका या कुटुंबीय व शिक्षकांच्या सहकार्याने तब्बल सात वर्षे नोकरी करत आहेत.

मोबाईल क्रमांक तोंडपाठ
सर्व कर्मचारी आणि प्राध्यापकांचे संपर्क क्रमांक त्यांच्या तोंडपाठ आहेत. फोन लावणे, मोबाईलवरून कॉल करणे आणि आलेले कॉल स्वीकारणे हाच त्यांचा दिनक्रम झालेला आहे. त्या स्वत: मोबाईल वापरत असून, त्यावरील सर्व फंक्शन त्या आॅपरेट करतात, हे विशेष.

Web Title: Namaskar .. I speak Sarika Jadhav ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.