बनपुरीच्या नाईकबाची यात्रा कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:51+5:302021-04-08T04:39:51+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, बनपुरी, जानुगडेवाडी गावचे सरपंच, ...

बनपुरीच्या नाईकबाची यात्रा कोरोनामुळे रद्द
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, बनपुरी, जानुगडेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
कोरोनाचा वाढता प्रभाव असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत नवीन नियमावली दिली आहे. त्यानुसार ५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. याकाळात धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध आहेत. बनपुरीतील नाईकबा देवाची यात्रा यावर्षी १८ एप्रिल रोजी होणार होती. ती कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून सुमारे दोन लाख भाविक येत असतात. गतवर्षीही कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात वाढता प्रभाव जाणवत असल्याने नाईकबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे.