नागठाणे आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST2021-04-08T04:40:11+5:302021-04-08T04:40:11+5:30

नागठाणे ( ता. सातारा) : येथील आठवडी बाजार शासन नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूर्णतः बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती ...

Nagthane weekly market closed | नागठाणे आठवडी बाजार बंद

नागठाणे आठवडी बाजार बंद

नागठाणे ( ता. सातारा) : येथील आठवडी बाजार शासन नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूर्णतः बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती नागठाणे गावच्या सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे यांनी दिली.

नागठाणे हे परिसरातील बाजारपेठेचे मोठे गाव असून, परिसरातील ५० गावांचा या गावांशी रोजचा संपर्क आहे. प्रत्येक आठवड्यातील मंगळवारी येथे सर्व प्रकारच्या भाजीपाल्यासोबत जीवनावश्यक वस्तूंचा बाजार भरविला जातो. त्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच गावातील नागरिक बाजारासाठी मोठ्या संख्येने नागठाणे येथे येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन दिवसांपासून येथील बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, पंचक्रोशीतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी. पंचक्रोशीतील नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे यांनी केले आहे.

Web Title: Nagthane weekly market closed