म्हैसूरच्या हस्तकला, मूर्ती होणार मेक्सिकोला ‘एक्स्पोर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:05+5:302021-02-05T09:15:05+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील उच्च दर्जाची फळे परदेशी क्रुझ व शिपिंग कंपनीद्वारे निर्यात करून स्थानिक शेतकऱ्यांना परदेशात उच्चांकी दर व हक्काची ...

Mysore handicrafts, idols to be 'exported' to Mexico | म्हैसूरच्या हस्तकला, मूर्ती होणार मेक्सिकोला ‘एक्स्पोर्ट’

म्हैसूरच्या हस्तकला, मूर्ती होणार मेक्सिकोला ‘एक्स्पोर्ट’

पश्चिम महाराष्ट्रातील उच्च दर्जाची फळे परदेशी क्रुझ व शिपिंग कंपनीद्वारे निर्यात करून स्थानिक शेतकऱ्यांना परदेशात उच्चांकी दर व हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा ‘आरजेके एक्स्पोर्ट‌्स प्रा. लि.’ या कंपनीचा स्थापनेमागचा प्रमुख हेतू होता. यातच एक नवीन पाऊल टाकत ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाद्वारे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन व काम मिळावे या हेतूने सॅण्डल वुड, लाकडी हस्तकला, ॲण्टिक शो पिस, पेंटिंग्ज या मेक्सिको, सिंगापूर, मलेशिया यांसारख्या विदेशातील मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स्पोर्ट करण्यात येणार आहेत. कारण म्हैसूर, जोधपूर, तामिळनाडू येथील कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीचे हॅण्डीक्राफ्ट‌्स व हस्तकलेचे विविध नमुने बनतात. त्याला परदेशात भरपूर मागणी आहे. हे लक्षात आल्यानंतर राहुलकुमार खडके यांनी या फॅक्टरशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणावर या हस्तकला मूर्ती, हॅण्डीक्राफ्ट‌्स उपलब्ध होतील, हे ओळखून स्वत: म्हैसूर, बेंगलोर, जोधपूर येथील फॅक्टरीला भेट दिली. तसेच संबंधिताना या वस्तू परदेशी मॉल्समध्ये पाठविणार असल्याचा मनोदय सांगीतला. कंपन्यांशी करार केला. त्यामुळे या देशी हस्तकलेतून मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम मिळणार असून, त्यांच्या वस्तूंना उच्चांकी दरही मिळणार आहे.

युवा उद्योजक राहुलकुमार खडके यांनी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम डोळ्यासमोर ठेवूनच हे पाऊल उचलले आहे. नुकताच त्यांना इंटरनॅशनल ट्रेड इम्पोर्ट-एक्स्पोर्ट २०२१ पुरस्कार जाहीर झाला आहे.

- चौकट

परदेशी बाजारपेठेत असते मागणी

परदेशी बाजारपेठेत सॅण्डल वुडमध्ये कोरलेली भारतीय राजमुद्रा, अशोक स्तंभ, तिरंगा ध्वज, ॲण्टिक ब्रास सँड वॉच, ग्रामोफोन, हॅण्डमेड वुडन टेलिफोन आदी ॲण्टिक शो पिस व वस्तूंना परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

Web Title: Mysore handicrafts, idols to be 'exported' to Mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.