शेततळ्यात उडी घेऊन मायलेकाची आत्महत्या
By Admin | Updated: November 10, 2016 21:41 IST2016-11-10T21:41:53+5:302016-11-10T21:41:53+5:30
फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील मायलेकानी गावातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनी नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

शेततळ्यात उडी घेऊन मायलेकाची आत्महत्या
आॅनलाइन लोकमत फलटण (सातारा), दि. 10 - फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील मायलेकानी गावातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनी नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. अनिता सुरेश सोनवलकर व ओंकार सोनवलकर अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
दुधेबावी येथील अनिता सुरेश सोनवलकर (वय ४०) व त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ओंकार या मायलेकानी गुरुवार, दि. १० रोजी सकाळी भवानीनगर येथील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. अनिता सोनवलकर या त्यांचे पती व कुटुंबीयांसमवेत मुंबई येथे राहण्यास असतात. दिवाळीच्या सुटीनिमित्त ते मूळगावी आले होते. घरातील सर्वजण गुरुवारी सकाळी सहानंतर जागे झाले असता घरात अनिता व ओंकार नसल्याचे व घराचे दार उघडे असल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता घराजवळील शेततळ्यात दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. या घटनेची फिर्याद ज्ञानदेव गणपत सोनवलकर यांनी दिली असून, पोलिस हवालदार कोळी तपास करत आहेत.