माझे कुटुंब माझी जबाबदारीअंतर्गत स्पर्धेत जावळी तालुक्याचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST2021-04-04T04:39:43+5:302021-04-04T04:39:43+5:30
कुडाळ : माझे कुटुंब माझी जबाबदारी या स्पर्धेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये जावळी तालुक्यातील शाळांनी ...

माझे कुटुंब माझी जबाबदारीअंतर्गत स्पर्धेत जावळी तालुक्याचे यश
कुडाळ : माझे कुटुंब माझी जबाबदारी या स्पर्धेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये जावळी तालुक्यातील शाळांनी सहभागी होऊन जिल्हा स्तरावर नऊ तर तालुका स्तरावर ३४ बक्षिसे मिळवत जिल्ह्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व, निबंध, गीतगायन, भित्तिचित्र व घोषवाक्य आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
चौकट
वक्तृत्व स्पर्धा - सिमरन भोसले, द्वितीय, लोहिया विद्यालय, सायगाव
गीतगायन स्पर्धा - अनुपमा दाभाडे, प्रथम, जि. प.केंद्रशाळा मेढा
नाटिका स्पर्धा : जि. प.शाळा एकीव, तृतीय
एकपात्री अभिनय शालेय गट : संचिता बेलोशे जि.प.शाळा केळघर तृतीय
खुला गट : अतुल नानोटकर द्वितीय, प्राथमिक शाळा, सायगाव
निबंध स्पर्धा शालेय गट - पृथ्वीराज रसाळ प्राथमिक शाळा खर्शी, द्वितीय
महाविद्यालयीन गट - सुश्मिता कलाल, तृतीय, क्रांती विद्यालय, सावली
प्रश्नमंजूषा स्पर्धा : शालेय गट : सिमरन भोसले, तृतीय, लोहिया विद्यालय, सायगाव
भित्तिचित्र व घोषवाक्य स्पर्धा : नीरज जाधव, तृतीय - मेरुलिंग विद्यालय वाघेश्वर
या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच तालुकास्तरावरही विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ३४ विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली आहेत.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सभापती जयश्री गिरी, उपसभाती सौरभ शिंदे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख आदींनी अभिनंदन केले.