माझे मूल माझी जबाबदारी अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:39+5:302021-06-16T04:51:39+5:30

मलकापूरात ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रीटमेंट या त्रिसुत्रीचा अवलंब नियोजन बैठकीत निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ...

My child is determined to carry out my responsibility campaign effectively | माझे मूल माझी जबाबदारी अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार

माझे मूल माझी जबाबदारी अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार

मलकापूरात ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रीटमेंट या त्रिसुत्रीचा अवलंब

नियोजन बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ० ते १८ वयोगटातील मुलांना संभाव्य धोका विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेकडून तातडीची बैठक घेण्यात आली. शहरात ट्रेसिंग, चाचण्या अन् उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करत मलकापुरात ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीलम येडगे होत्या.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता कुटुंबासह समाजात जनजागृती करणे, उपलब्ध मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. पूर्व उपाययोजना म्हणून ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. त्या अभियानाची मलकापुरात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांची तातडीची बैठक घेतली.

बैठकीस बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला शिंगण, प्रभाग अध्यक्ष नूरजहान मुल्ला, आनंदी शिंदे, कमल कुराडे, सागर जाधव, अजित थोरात, आनंदराव सुतार, राजू मुल्ला, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, जनसंपर्क अधिकारी ज्ञानदेव साळुंखे, कार्यालय अधीक्षक राजेश काळे, नगर अभियंता शशिकांत पवार, प्रभाग नोडल अधिकारी राहुल अडसूळ, हेमंत पलंगे, बाजीराव येडगे, रामचंद्र शिंदे, उमेश खंडागळे, मनोहर पालकर, आत्माराम मोहिते, दादासाहेब शिंदे, पांडुरंग बोरगे उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘पालिकेने विविध उपाययोजनांद्वारे पहिल्या लाटेत शहर कोरोनामुक्त राहण्यासाठी तर दुसऱ्या लाटेत बाधित दर नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले आहे. तिसऱ्या लाटेत शहरात जनजागृती करून वेळीच ट्रेसिंग, तपासणी व उपचार उपलब्ध करण्याचे ठरवण्यात आले आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करत शहरात हे अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार केला.

चौकट

वयोगटानुसार शिक्षण विभागांवर जबाबदारी

० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प विभाग, ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, १४ ते १८ वयोगटातील मुलांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. पालिकेचे शिक्षण मंडळ नसल्याने हे काम अंगणवाडीसेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना करावे लागणार आहे.

कोट

सर्वेक्षणासाठी अद्ययावत अर्ज तयार केला आहे. यामुळे शहरातील एकही मूल सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही. सर्वेक्षणामधे कोरोनाबाधित व कुपोषित असलेल्या बालकांना पालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र मोफत तपासणी करणार आहेत. त्यांना पालिका व रोटरी क्लबच्या वतीने मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.

- ज्ञानदेव साळुंखे

जनसंपर्क अधिकारी

फोटो मलकापूर-कोरोना

मलकापूर येथे ‘माझं मूल, माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकांची तातडीची बैठक घेतली. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

150621\img-20210614-wa0042.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

मलकापूरात माझं मुल माझी जबाबदारी हे आभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पालिकेच्यावतीने प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकांची तातडीची बैठक घेतली. (छाया- माणिक डोंगरे)

Web Title: My child is determined to carry out my responsibility campaign effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.