गडहिंग्लज कारखाना मुश्रीफांनी जावयासाठी चालवायला दिला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:43 IST2021-09-21T04:43:34+5:302021-09-21T04:43:34+5:30

कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांना सोमवारी पहाटे कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ...

Mushrifs let Gadhinglaj factory run! | गडहिंग्लज कारखाना मुश्रीफांनी जावयासाठी चालवायला दिला!

गडहिंग्लज कारखाना मुश्रीफांनी जावयासाठी चालवायला दिला!

कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांना सोमवारी पहाटे कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असून या घोटाळ्याबाबत मंगळवारी ईडीकडे कागदपत्रे देणार असल्याचेही सोमय्या या वेळी म्हणाले.

‘आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिले आहेत. त्यावर चौकशी सुरू झाली असून मी अधिक माहिती मागवली आहे. ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करीत आहेत. सध्या या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोल्हापुरात प्रतिबंध केल्याचा आदेश पोलिसांनी मला दिला. मात्र, या आदेशात मला मुंबईतून बाहेर पडू देऊ नका. कोंडून ठेवा. असा कसलाच उल्लेख नाही. गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही, हा ठाकरे सरकारचा कसला आदेश आहे? मला डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

- चौकट

मुश्रीफांचे कार्यकर्ते गुंड आहेत का..?

हसन मुश्रीफ सोमवारी कोल्हापुरात येणार आहेत. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोल्हापुरात जमले आहेत. त्यातच माझा कोल्हापूरला दौरा झाला तर गनिमी काव्याने माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे लेखी पत्र मला देण्यात आले. माझ्यावर हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुश्रीफांचे कार्यकर्ते गुंड आहेत का? असा सवालही सोमय्या यांनी या वेळी केला.

फोटो : २०केआरडी०१

कॅप्शन : मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कऱ्हाडच्या रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

फोटो : २०केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडात स्थानबद्ध केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Web Title: Mushrifs let Gadhinglaj factory run!