शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! डोक्यात दगड घालून युवतीचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह; कराड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 11:16 IST

मृत युवतीची ओळख पटविण्याचे तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कऱ्हाड : डोक्यात दगड घालून युवतीचा खून करण्यात आला. कराड तालुक्यातील कोरेगाव गावामध्ये आज, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळला असून कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले आहे. मृत युवतीची ओळख पटविण्याचे तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव गावच्या हद्दीत कार्वे ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत भैरोबा मंदिर आहे. या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. सोमवारी सकाळी काही शेतकरी याठिकाणी गेले असता त्यांना युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता युवतीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित युवती गावातील नसल्यामुळे तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आहे. कऱ्हाड तालुक्यात गत आठ महिन्यांपासून खून सत्र सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगावमध्ये आणखी एका युवतीचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली असून युवतीची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या कराड ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस