शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नरवणे येथे वाळूच्या भांडणावरून दोघांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:02 IST

Crimenews satara Police : वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटांत सकाळी साडेदहा वाजता नरवणे (ता. माण) येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. या खुनामुळे माण तालुका हादरला असून, नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देनरवणे येथे वाळूच्या भांडणावरून दोघांचा खून नरवणे येथे तणावाचे वातावरण

म्हसवड :  वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटांत सकाळी साडेदहा वाजता नरवणे (ता. माण) येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. या खुनामुळे माण तालुका हादरला असून, नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे.याबाबतची पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, माणच्या तहसीलदारांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव २२ फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी ३३ हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता. दरम्यान, विलास धोंडिबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की, चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत.

चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच वाद वाढत गेला व बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडिबा जाधव यांच्या गटांमध्ये मारामारी झाली. चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेकजण जखमी झाले.

जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडिबा जाधव यांना दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या मारामारीमध्ये अन्य जखमी झालेले सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे समजते. दोन्ही कुटुंबांतील फिर्यादीचे जबाब घेण्याचे काम व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस