शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे स्वच्छतागृह चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:44 IST

शिरवळ : शिरवळ बसस्थानकातील स्वच्छतागृहात सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटत खून करण्यात आला. रणजित गणपतराव जाधव ...

शिरवळ : शिरवळ बसस्थानकातील स्वच्छतागृहात सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटत खून करण्यात आला. रणजित गणपतराव जाधव (वय ४०, रा. बौद्ध आळी, शिरवळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील रणजित जाधव यांनी बसस्थानकातील स्वच्छतागृह चालविण्याकरिता घेतले आहे. गुरुवार, दि. १९ रोजी रणजित जाधव हा स्वच्छतागृहाच्या याठिकाणी होता. तेव्हा त्याठिकाणी अज्ञात दोघांबरोबर रणजित जाधव यांची वादावादी झाली. वादावादीत संबंधितांनी रणजित जाधव याचा गळा आवळत डोके आपटले. यामध्ये रणजित गंभीर जखमी झाला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत रणजित जाधव याचा गळा, चेहरा, खांद्यावर जखमाचे व्रण होते.

याबाबत माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, शिरवळचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत रणजित जाधव याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनास्थळी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. एका संशयिताला चौकशीकरिता सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरवळ पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे. संजय जाधव यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरवळचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे तपास करीत आहे.

फोटो रणजित जाधव