शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

खूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:00 IST

पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखूनप्रकरणातील संशयिताचा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्नसंशयित सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने गुरुवारी सायंकाळी पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आष्टे, ता. सातारा येथील तेजस जाधव या युवकाचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात साहिल शिकलगारसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला या संशयितांना ठेवण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील साहिल शिकलगार याला चौकशीसाठी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लॉकअपचा दरवाजा उघडला होता. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी साहिलच्या जागेवरच पकडले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर