शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून, डोक्यात मारली लोखंडी पार; नागझरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:09 IST

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणाऱ्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पार मारून खून केला. या घटनेने नागझरीसह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबू जाधव (वय-३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. बाबू बापू जाधव (४२, मूळ रा. सातारा, सध्या रा. नागझरी, ता. कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मूळचे सातारा येथील असलेला बाबू जाधव हा मोलमजुरीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी पत्नी व पाच मुलांसह नागझरी येथे आला. गावात मिळेल ते काम करुन ते कुटुंब उदरनिर्वाह चालवत होते. आज, सोमवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन बाबू जाधव याने पत्नी वैशाली हिला लोखंडी पहारीने मारहाण केली.पहारीचा डोक्यात बसलेला जिव्हारी ठोक्यामुळे वैशाली हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान बाबू याने स्वत:लाही मारहाण करून घेतल्याची चर्चा असून तोही जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी सातारा शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.      

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी