शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकाराचा खून, साताऱ्यात उडाली एकच खळबळ

By दत्ता यादव | Updated: November 29, 2022 12:38 IST

अपहरण करुन खून केल्यानंतर मृतदेह डोंगरावरील ओढ्यात टाकून दिला

सातारा : व्याजाने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने खासगी सावकार विलास महिपती जाधव (वय ५५, रा. खोडद, ता. सातारा) यांचा गळा आवळून निघृर्ण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना काल, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.आकाश तुकाराम जांभळे (रा. जांभगाव, ता. सातारा), संतोष संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर, काशीळ, ता. सातारा), संजय रामचंद्र जाधव (रा. खोडद, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २० नोव्हेंबरला दुपारी विलास जाधव हे घरासमोरील ज्वारी गोळा करत असताना जेवण करून येतो असे सांगून निघून गेले. परंतू घरी न आल्याने त्यांची पत्नी जयश्री जाधव यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यानंतर विलास जाधव हे खासगी सावकारी करत होते. त्यांनी अनेकांना व्याजाने पैसे दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली.दरम्यान, सातारा तालुक्यातील निसराळे फाट्यावर विलास जाधव हे काही जणांसोबत बोलत उभे असल्याचे काही लोकांनी पाहिले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले असता आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खासगी सावकार विलास जाधव यांचा खून केल्याची कबुली दिली.

अपहरण करुन केला खूनत्यानंतर पोलिसांनी संशयितांना घटनास्थळावर नेले. या तिघांनी विलास जाधव यांचे गाडीतून अपहरण केले. कास पठाराजवळील पेट्री येथे असलेल्या छोट्याशा डोंगराजवळ त्यांना नेण्यात आले. या ठिकाणी त्यांचा नायलॉनच्यादोरीने गळा आवळला. त्यानंतर दगडाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. ते मृत झाल्यानंतर आरोपींनी विलास जाधव यांना डोंगरावरील ओढ्यात टाकून दिले. पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ओढ्यातून वर काढला. तिघा आरोपींवर बोरगाव पोलीस ठाण्यात खून करणे, अपहरण आदी कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस