शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्या, मध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:35 IST

Crimenews Murder Satara- सातारा शहराचे उपनगर असलेल्या कृष्णानगरमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नाही.

ठळक मुद्देसाताऱ्यात गळा चिरून वृद्ध महिलेची हत्यामध्यरात्रीची घटना; कारण अस्पष्ट

सातारा: शहराचे उपनगर असलेल्या कृष्णानगरमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नाही.जया गणेश गायकवाड-पाटील असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जया पाटील यांचा कृष्णानगर येथील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यात त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा शेंद्रे येथे वास्तव्यास आहे तर मुलीचे लग्न झाले असून, ती सासरी राहते.

दरम्यान, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरात आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.जया पाटील यांचा खून संपत्ती की अन्य कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. त्यांच्या घरात रात्री कोणी आले होते का, याचीही पोलीस शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. या खुनामुळे कृष्णानगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस