कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:31 IST2021-04-29T04:31:41+5:302021-04-29T04:31:41+5:30

फलटण : पहिली पत्नी असताना वडिलांनी दुसरे लग्न का केले, यातून झालेल्या वादातून पिंप्रद ता. फलटण येथे वडिलांनी मुलाचा ...

Murder of a child with an ax wound | कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून

कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून

फलटण : पहिली पत्नी असताना वडिलांनी दुसरे लग्न का केले, यातून झालेल्या वादातून पिंप्रद ता. फलटण येथे वडिलांनी मुलाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सूरज भोसले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दामिणी सूरज भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, दि. २७ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सासरे सिकंदर काळ्या ऊर्फ डिसमुख भोसले (रा. पिंप्रद, ता. फलटण) याने पहिली बायको असताना दुसरी बायको का केली, यावरून मुलगा सूरज भोसले (वय ३०) याच्याशी वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर भांडणात झाल्यावर सिकंदर भोसले याने सूरज भोसले यांच्या डोक्यात व डाव्या पायावर कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर दुखापत करून खून केला आहे. अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर दोन तासांत सिकंदर काळ्या ऊर्फ डिसमुख भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीवरून सिकंदर काळ्या ऊर्फ डिसमुख भोसले याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी दहिवडीचे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

Web Title: Murder of a child with an ax wound