शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:41 IST

शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला.

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून शीला दादासो फाळके (वय ३०, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा) या विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला. ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.पती दादासो गणपत फाळके, सासू अरुणा गणपत फाळके, सासरे गणपत मारुती फाळके, दीर सागर गणपत फाळके (सर्व रा. कूपर काॅलनी, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीला हिचे दादासो फाळके याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता शीला फाळके ही घरातील बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर तिला घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेनंतर नातेवाइकांनी शीलाचा खून झाला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शीलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्यामुळे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना समजू शकला नाही.परंतु शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला. अशी तक्रार मोनिका जर्नादन साठे (रा. सदर बझार, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पती दादासो फाळके याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी