वाठार किरोली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मुरलीधर गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:42+5:302021-09-02T05:24:42+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नागरिक मुरलीधर गायकवाड यांची निवड करण्यात ...

वाठार किरोली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मुरलीधर गायकवाड
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नागरिक मुरलीधर गायकवाड यांची निवड करण्यात आली.
वाठार ग्रामपंचायतींमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली; तर जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरलीधर गायकवाड यांचा माजी सैनिक मानाजी पवार व कोरेगाव तालुका खरेदी संघाचे माजी उपाध्यक्ष भरतराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड, ग्रामसेवक जितेंद्र निकम, माजी उपसरपंच सीताराम गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, विक्रांत गायकवाड, शिवाजी माळी, बजरंग गायकवाड, तुकाराम वीरकर, चंद्रकांत गायकवाड, संजय गायकवाड, प्रभाकर गायकवाड, शामराव शिंदे, केशव गुजले, हणमंत पिसे, मालन पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनंतर मुरलीधर गायकवाड म्हणाले, ‘गावातील ज्येष्ठ नागरिकांना व तरुणांना बरोबर घेऊन सनदशीर मार्गाने गावातील तंटे गावातच मिटविण्याचा प्रयत्न करणार आहे. गाव तंटामुक्त ठेवण्यासाठी काम करण्यात येईल.’
फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुरलीधर गायकवाड यांचा सत्कार मानाजी पवार, भरतराव गायकवाड व भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. (छाया : जयदीप जाधव)
...........................