फुकट्या जाहिरातदारांना पालिकेचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST2021-01-08T06:03:49+5:302021-01-08T06:03:49+5:30

सातारा : शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पालिकेने फुकट्या जाहिरातदारांना बुधवारी चांगलाच दणका दिला. ...

Municipal Corporation slaps free advertisers! | फुकट्या जाहिरातदारांना पालिकेचा दणका!

फुकट्या जाहिरातदारांना पालिकेचा दणका!

सातारा : शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पालिकेने फुकट्या जाहिरातदारांना बुधवारी चांगलाच दणका दिला. अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरात कारवाई करून तब्बल २२१ फ्लेक्स बोर्ड जप्त केले.

शहरात सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यापूर्वी संबंधितांना पालिका व पोेलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; परंतु अनेक व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल चालक, विविध खासगी संस्थांकडून परवानगी न घेताच खांबांवर, शासकीय इमारतींवर, फूटपाथ तसेच झाडांवर फ्लेक्स बोर्ड लावले जातात. अशा फुकट्या जाहिरातदारांमुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे.

फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे रूप बकाल होऊ लागले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘विनापरवाना फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची तातडीने दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी शहरात कारवाई मोहीम हाती घेतली. नगरपालिका ते पोवई नाका, पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सदर बझार कॅनॉल ते जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय ते पोवई नाका या मार्गावरील लाकडी १६०, लोखंडी ५८, तर मोठे फ्लेक्सबोर्ड ३ असे एकूण २२१ फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरात गुरुवारी देखील ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती निकम यांनी दिली.

फोटो : ०६ जावेद १६

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी ठिकठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केले. (छाया : जावेद खान)

Web Title: Municipal Corporation slaps free advertisers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.