मुळीकवाडी यात्रा कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST2021-04-03T04:35:20+5:302021-04-03T04:35:20+5:30

आदर्की : मुळीकवाडी (ता. फलटण) येथील ग्रामदेवता मरी-जरी माता यात्रोत्सव ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत यात्रेतील कार्यक्रम रद्द ...

Mulikwadi Yatra canceled | मुळीकवाडी यात्रा कार्यक्रम रद्द

मुळीकवाडी यात्रा कार्यक्रम रद्द

आदर्की : मुळीकवाडी (ता. फलटण) येथील ग्रामदेवता मरी-जरी माता यात्रोत्सव ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत यात्रेतील कार्यक्रम रद्द करून

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवीचे धार्मिक विधी होणार आहेत.

मुळीकवाडी (ता. फलटण) येथे मरी-जरी मातेचा यात्रोत्सव दि. ३ रोजी होणार होता, परंतु कोरोनामुळे

ग्रामस्थ व लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस

निरीक्षक विशाल वायकर यांच्या उपस्थितीत बेठक पार

पडली. या बैठकीमध्ये पालखी मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले तर खेळणी, मिठाई आदी दुकानास बंदी घालण्यात आली.

देवीचा धार्मिक विधी मोजक्या लोकांमध्ये पार पाडण्यात येणार आहे. या बैठकीस उपसरपंच गणेश कदम, सुनील जाधव, हणमंत मुळीक, लहुराज मोहिते, पोलीस पाटील नीलम मुळीक, लहुराज मुळीक, अविनाश शिंदे आदी

ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Mulikwadi Yatra canceled