तक्रारींसाठी ‘एमएसएस’ सुविधा
By Admin | Updated: November 21, 2014 00:31 IST2014-11-20T21:43:33+5:302014-11-21T00:31:05+5:30
तातडीने होणार निपटारा : वाई पालिकेतर्फे सेवेचा शुभारंभ

तक्रारींसाठी ‘एमएसएस’ सुविधा
वाई : ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये तक्रारी नोंदविण्यासाठी ‘एमएसएम’ सेवा सुरू केली जात असून, वाई नगरपालिकेनेही या सेवेचा शुभारंभ केला आहे,’ अशी माहिती वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी दिली.
नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, या हेतूने पालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व विभागांना कोड दिले असून, नागरिकांनी आपल्या सर्व तक्रारी ९९७०००१३१२ या क्रमांकावर ‘एमएमएस’ करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
गटाकरिता डब्ल्यू १ - आरोग्य विभाग, डब्ल्यू २ - विद्युत विभाग, डब्ल्यू ३ - पाणीपुरवठा विभाग, डब्ल्यू ४ - बांधकाम विभाग, डब्ल्यू ५ - कर विभाग, डब्ल्यू ६ - अग्निशमन विभाग, डब्ल्यू ७ - घंटागाडी, डब्ल्यू ८ - एनयूएलएम योजना, डब्ल्यू ९ - मार्केट सेवा, डब्ल्यू १० - इतर सेवा अशा सर्व सेवांच्या तक्रारींचे विभाग करण्यात आले आहे. यावर संबंधित अधिकारी यांच्याकडे हा ‘एसएमएस’ जाऊन तातडीने तक्रार निवारणाची व्यवस्था होणार आहे. (प्रतिनिधी)
विभागनिहाय कामकाज
आरोग्य विभाग - नाला रस्ते, गटार सफाई, सांडपाणी विल्हेवाट, बेवारस प्राणी, मैला वाहन आवश्यकता, सार्वजनिक शौचालय, दुरुस्ती यांचा समावेश आहे.
पाणीपुरवठा विभाग - नळाचे पाईप लिकेज, वार्डातील हातपंप दुरुस्ती, नळाला पाणी येत नसल्याबद्दल नळमीटर बंद या कामांची जबाबदारी आहे.
बांधकाम विभाग - अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, घरकुल बांधकामास परवानगी, बांधकाम दर्जा, काँक्रिट रोड, नालाबांधकाम, रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलणेबाबत
एनयूएलएम योजना - दारिद्र्यरेषेखालील दाखले, बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण, मार्केट सेवा, मार्केटमधील जागा, वाहतूक व परवाना तक्रारी व इतर सेवा यांचा समावेश आहे.
करविभाग - मालमत्ता बिलांबाबत चौकशी करण्याबाबत
अग्निशमन विभाग - आग आटाक्यात आणण्यासाठी
घंटागाडी - कचरा वाहून नेण्याबाबत...
विद्युत विभाग - स्ट्रीट लाईट, विद्युत खांब टाकणे या कामाचा समावेश आहे.