वीजपुरवठा तोडल्याने कोंडवेत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST2021-03-13T05:12:44+5:302021-03-13T05:12:44+5:30

सातारा : बिल थकल्याने विजेची जोडणी तोडल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना सातारा तालुक्यातील कोंडवे येथे ...

MSEDCL employee beaten up in Kondve | वीजपुरवठा तोडल्याने कोंडवेत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

वीजपुरवठा तोडल्याने कोंडवेत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

सातारा : बिल थकल्याने विजेची जोडणी तोडल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना सातारा तालुक्यातील कोंडवे येथे घडली असून दोघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंडवे येथे अनंतराज मल्टिपर्पज हॉल, राजदीप हॉटेल येथील विजेचे बिल भरले नव्हते. त्यामुळे ‘महावितरण’चे कर्मचारी तेथे गेले व वरिष्ठांच्या आदेशाने खांबावरून विजेची जोडणी तोडण्यात आली. त्याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी ‘महावितरण’चे रामदास शंकर कार्वे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आनंत पांडुरंग लावंघरे व अभिषेक आनंत लावंघरे (दोघेही रा. कोंडवे) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी हे तपास करत आहेत.

......................................................

Web Title: MSEDCL employee beaten up in Kondve