महावितरणचा उच्चदाबामुळे टीव्ही, फ्रीज, मोबाइलसह घरगुती वस्तू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:58+5:302021-09-12T04:44:58+5:30
कोळकी : महावितरणचा उच्चदाबाचा विडणीकरांनी झटका बसला आहे. अनेकांचे घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाइल चार्जर, लॅपटॉप अशा अनेक वस्तू जळाल्या ...

महावितरणचा उच्चदाबामुळे टीव्ही, फ्रीज, मोबाइलसह घरगुती वस्तू खाक
कोळकी : महावितरणचा उच्चदाबाचा विडणीकरांनी झटका बसला आहे. अनेकांचे घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाइल चार्जर, लॅपटॉप अशा अनेक वस्तू जळाल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, विडणी येथे शुक्रवारी दुपारी बारानंतर महावितरणची लाइट अचानक उच्चदाब वाढल्याने टीव्ही, फ्रीज, मिक्सर, मोबाइल, साउंड सीस्टिम, चार्जर अशा अनेक घरगुती वस्तू जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना माहिती देऊनही जवळपास चार ते पाच तास लाइटच्या उच्चदाब सुरूच होता.
उच्चदाबामुळे अहमद शेख यांचा टीव्ही, फ्रीज, फिल्टर मशीन, उम्मद शेख यांचा टीव्ही, अल्लाबक्श शेख यांचे इलेक्ट्रिक घड्याळ, हारुण शेख यांच्या दोन ट्युब, अनिल देशपांडे यांचा टीव्ही, एलईडी लाइट, गोरख काकडे यांचा टीव्ही, शंकर साळुंखे यांचा लॅपटॉप, चार्जर, ट्युब लाइट. रमेश भोसले यांचा टीव्ही, कैलास गोसावी यांचा टीव्ही, एलईडी लाइट, सतीश कर्वे यांचा वॉटर फिल्टर मशीन, प्रवीण दीक्षित यांचा टीव्ही, रंजना नाळे यांची डंक मोटर यांचे इलेक्ट्रिक साहित्य उच्चदाबामुळे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चौकट -
महावितरण विडणी कार्यालयांतर्गत सोनवडी बुद्रुक, सोनवडी खुर्द, तिरकवाडी, वडले, दुधेबावी, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द, झिरपवाडी ही नऊ गावे आहेत. कर्मचारी पुरेसे नाहीत. पर्मनंट कर्मचारी उपस्थिती नसतात. कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर या विभागाचा भार टाकला आहे, तर गेली सात ते आठ वर्षे अधिकारी या विभागाला नाही. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास करावा लागत आहे.