शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा 

By सचिन काकडे | Updated: November 17, 2025 15:44 IST

Local Body Election: आज खुलणार नावांचा लखोटा, कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’?

सचिन काकडे

सातारा : सातारा नगरपालिकेचा राजकीय रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, नगराध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही ‘राजें’ने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही मातब्बर नेत्यांनी नगराध्यक्षपदावर दावा केल्याने कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’ उमटवायची, याचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठीचा हा ‘संग्राम’ आता अंतिम टप्प्यात असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व ५० नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचे ‘गुपित’ उघड होणार आहे.सातारा पालिकेची संपूर्ण सूत्रे ताब्यात घेत भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेला उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. निवडून येण्याची क्षमता आणि सक्षम जनसंपर्क या कठोर निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मूळ भाजप आणि शिंदेसेनेच्या निष्ठावंतांना संधी देत ५० उमेदवारांची यादी दोन्ही राजेंकडून जवळपास निश्चित झाली असल्याची चर्चा आहे. परंतु, सर्वांत महत्त्वाची असलेली नगराध्यक्षपदाची जागा कोणाच्या वाट्याला येणार, यावरून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

रणधुमाळीतील गुप्त बैठका..गेल्या तीन दिवसांत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात गाठीभेटी व बैठकांचा धडाका सुरू आहे. चर्चा व निवडीची कोणालाही कानकून लागू नये यासाठी प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत असून, या बैठका अज्ञातस्थळी घेतल्या जात आहेत. रविवारीदेखील दोन्ही राजेंमध्ये नगराध्यक्ष निवडीवरून बराच ‘काथ्याकूट’ झाला. या बैठकीत काही जागा या बिनविरोध करण्यावरही खल झाल्याची माहिती मिळत आहे.

कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’?दोन्ही राजेंकडे नगराध्यक्षपदाला न्याय देऊ शकणारे अनेक जुने व नवीन सक्षम चेहरे उपलब्ध आहेत. मात्र, हे पद खासदार उदयनराजे भोसले यांच्या पारड्यात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार तितकाच सक्षम असला तरी अंतिम क्षणी काहीही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे नगराध्यपदाची ‘राजमुद्रा’ कोणाच्या नावावर उमटविली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस!नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. १७) शेवटचा दिवस आहे. याच दिवशी राजेंकडून सर्व ५० उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून, त्यांना पक्षाचे अधिकृत ‘ए बी फॉर्म’दिले जातील. नगराध्यक्ष पदाचा प्रमुख उमेदवार देखील अर्ज दाखल करणार आहे, पण तो ‘गुपित’ चेहरा कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन राजेंकडून नगराध्यक्षपदाचा तिढा न सुटल्यास भाजपकडून उमेदवार दिला जाईल, या चर्चेनेही शहरात रंग भरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipal Election: Two Kings Vie for President Post

Web Summary : Satara's municipal election intensifies as two prominent leaders, Udayanraje Bhosale and Shivendrasinhraje Bhosale, compete for the president position. Secret meetings and intense negotiations are underway to finalize candidates. The unveiling of the presidential nominee is eagerly awaited as the deadline approaches.