सातारा:साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे कधी काय करतील याचा नेम नाही.. कधी डंपर तर कधी जेसीबी तर कधी धूम स्टाईल बाईक आणि सुसाट कार चालवताना याआधीही आपण उदयनराजेंना पाहिले आहे. आपल्या हटके स्टाईलने ते नेहमीच चर्चेत असतात.काही दिवसापुर्वीच पुष्पा स्टाईल लुंगी परिधान करुन त्यांनी साताऱ्यात एंन्ट्री केली होती. तर दोनच दिवसापुर्वी त्यांनी ‘चला हवा येऊ दे’च्या मंचावर थेट हवेतून एन्ट्री घेतली होती. आता उदयनराजे यांनी तिन चाकी रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेत थेट ‘जलमंदिर’ परिसरातून फेरफटकाही मारला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाने रिक्षा स्पर्धेचे आयोजन केले होतं. यामध्ये विजेत्या स्पर्धकाच्या रिक्षाचे स्टेरिंग उदयनराजेंनी हातात घेत जलमंदिर निवासस्थानी रपेट मारली.
सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:02 IST