शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:03 IST

डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी खासदार उदयनराजे भोसलेंची होती आदा. यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले

सातारा : खासदार उदयनराजे भोसले केव्हा, कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांची प्रत्येक कृती हटके असते. त्याचाच प्रत्यय सातारा तालुक्यातील देगाव येथे काल, रविवारी आला. येथील बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी खासदार उदयनराजेंनी त्याच्या स्टाईलमध्ये एन्ट्री करत चक्क बैलगाडीचा कासरा हाती घेतला. डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी त्यांची आदा हाेती. ढाेल-ताशांच्या गजरात बैलगाडीप्रेमींनी उदयनराजेंचे स्वागत केले.यावेळी त्यांनी काॅलर उडवून वातावरणात रंगही भरला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले. उदयनराजे भाेसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने देगाव येथे उदयनराजे मित्र समूहातर्फे बैलगाडी शर्यतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. रविवारी सायंकाळी स्वत: उदयनराजे शर्यतीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी येथील वातावरणाचा नूरच पालटून टाकला.उपस्थित समर्थक आणि बैलगाडी शर्यत प्रेमींनी एकच जल्लाेष केला. यावेळी राजेंची खास स्टाईल उपस्थितींना पाहिला मिळाली. राजेंनी बैलगाडीवर उभे राहून हातात कासरा घेतला आणि खास आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये काॅलर उडवली.यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, ‘मी शेतकरीच आहे. माझ्या इलेक्शनच्या अ‍ॅॅफेडिव्हटमध्ये बघा. या शर्यतीचे मी फक्त निमित्त आहे. याचे श्रेय उदयनराजे मित्र समूहाला आहे. हाॅर्स रेसमध्ये माेठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल हाेते. त्यामुळे तेथे बंदी घातली नाही. शेतकरी बैलांना मुलांप्रमाणे जपतात. त्यामुळे बैलगाडी शर्यती या झाल्या पाहिजेत.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBull Cart Raceबैलगाडी शर्यत