शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा रुग्णालयातील ‘एमआरआय’ मशीन अकोल्याला नेण्याच्या हालचाली, रुग्णांवर येणार आर्थिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:41 IST

सिटी स्कॅन मशीनही कऱ्हाडला नेले..

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या ‘एमआरआय’ मशीनच दुखणं वाढलं असून, हे मशीन आता अकोला येथे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे मशीन नेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये १० ते १५ हजार रुपये एमआरआयसाठी मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हे मशीन ‘सिव्हिल’मध्येच ठेवावे, असा सूर सातारकरांमधून उमटू लागला आहे.सातारा जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गावर तसेच आंतरराज्य मार्गावर अनेक अपघात होत आहेत. या अपघातांत जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिलमध्ये आणले जाते. रुग्णावर तातडीने उपचार होण्यासाठी रुग्णाचे एमआरआय केले जाते. जेणेकरून रुग्णाच्या मेंदू व शरीरातील इतर भागावर नेमकी जखम, अंतर्गत रक्तस्त्राव कोठे झाला आहे, हे समजते.त्यानंतर योग्य उपचार होत असतात. हे मशीन गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. असे असताना हे मशीन आता अकोला येथे नेण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्या आहेत. याची कारणेही भन्नाट दिली जात आहेत. म्हणे, जागेअभावी हे मशीन अकोला येथे नेण्यात येत आहे.वास्तविक, हे एमआरआय मशीन २०२२ मध्ये सिव्हिलमध्ये दाखल झाले. काही दिवस हे मशीन नियमित सुरू राहायचे. मात्र, कधी तज्ज्ञ नाहीत तर कधी मशीन बिघडले आहे, असे सांगून रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. पूर्वी जशी परिस्थिती होती. तशीच आताही आहे. त्यामुळे मशीन नियमित कधी सुरू झालेच नाही; परंतु एमआरआय मशीन सुरू ठेवण्यासाठी ज्या काही त्रुटी असतील त्या भरून काढून जिल्हा प्रशासनाने हे मशीन कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे असताना काही तरी कारणे सांगून हे मशीन अन्य जिल्ह्यात नेले तर सातारा शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यांतील सर्वसामान्य रुग्णांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे हे मशीन कोणत्याही परिस्थितीत ‘सिव्हिल’मध्येच राहावे, यासाठी लोकप्रतिनिधींसह सातारकरांना आता उठाव करण्याची वेळ आली आहे.

सिटी स्कॅन मशीनही कऱ्हाडला नेले..तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश जगदाळे यांच्या काळात असलेले सिटी स्कॅन मशीन अशाच प्रकारे कऱ्हाड येथे नेण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा सर्वसामान्य रुग्णांची मोठी परवड झाली होती.

‘हे’ मशीन म्हणजे ‘सिव्हिल’चा जीव..एमआरआय मशीन म्हणजे ‘सिव्हिल’चा अक्षरश: जीव आहे. हा जीवच जर बाहेर काढून नेत असतील तर रुग्ण अर्धमेले होतील. खासगीमध्ये एमआरआय करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. १० ते १५ हजार रुपये यासाठी खर्च येतो. एवढे पैसे सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णांनी कोठून आणायचे; एकीकडे मोफत उपचार म्हणून दिंडोरा पिटायचा आणि दुसरीकडे रुग्णांना अशा मशीन गायब करून भुर्दंड पाडायचा, असाच काहीसा उद्योग सिव्हिलमध्ये सुरू असल्याचा आरोप सातारकरांमधून केला जातोय.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलAkolaअकोला