सात दिवसात वीज न जोडल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:24+5:302021-04-02T04:40:24+5:30
कोपर्डे हवेली : कऱ्हाड सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पंधरा दिवसांपासून वीज तोडली असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान आणि त्रास ...

सात दिवसात वीज न जोडल्यास आंदोलन
कोपर्डे हवेली : कऱ्हाड सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पंधरा दिवसांपासून वीज तोडली असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान आणि त्रास होत आहे. यामुळे सातारा जिल्हा भाजप युवा मोर्चाने सात दिवसात वीज न जोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी प्रभारी प्राचार्य एस. आय. भोसले यांना निवेदन दिले. यावेळी पैलवान अक्षय चव्हाण, किशोर साळवे, श्रीकांत झेंडे, प्रशात कदम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या संस्थेतील पंधरा दिवसांपासून विजेचे कनेक्शन बंद आहे. त्यामुळे कौशल्य विकास यांत्रिकीकरण विभाग बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यातील काही विद्यार्थी या ठिकाणी निवास करीत असतात. त्यांना विजेअभावी अंधारात चाचपडत राहावे लागत आहे. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याचा आणि डासांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांसारखे प्रकार घडले आहेत. वरील बाबींचा विचार करता ही बाब गंभीर आहे. या गोष्टीचा विचार करून आम्ही आपणास वीज जोडणीसाठी सात दिवसांची मुदत देत आहेत. सात दिवसांनंतर कनेक्शन जोडले नाही तर संस्थेच्या पुढे आंदोलन करू, याबाबत गांभीर्याने विचार करावा.