महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST2021-09-21T04:44:40+5:302021-09-21T04:44:40+5:30

कोरेगाव : माण तालुक्यातील मंडलाधिकारी एस. डी. सानप यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा महसूल खाते ...

Movement to stop the writing of revenue employees | महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

कोरेगाव : माण तालुक्यातील मंडलाधिकारी एस. डी. सानप यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग तीन कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवार, दि. २० रोजी संपूर्ण जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले होते. कोरेगाव तालुक्यात या आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

सानप यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांना म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता, केवळ खटाव-माणच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ती चुकीची आहे. ही कारवाई रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर शासकीय कामकाजाचा सोमवार हा पहिला दिवस होता, मात्र कर्मचाऱ्यांचा काम बंद असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Web Title: Movement to stop the writing of revenue employees