‘सह्याद्री’वर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:28+5:302021-03-24T04:37:28+5:30

कऱ्हाड : एकरकमी एफआरपीबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरील दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोर ...

Movement on 'Sahyadri' | ‘सह्याद्री’वर आंदोलन

‘सह्याद्री’वर आंदोलन

कऱ्हाड : एकरकमी एफआरपीबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरील दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. २५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

रस्त्यालगत कचरा

कोपर्डे हवेली : कऱ्हाड ते मसूर रस्त्यानजीक बनवडी फाटा ते सिंदल ओढा यादरम्यान अज्ञाताकडून कचरा टाकण्यात येत असून, त्याचा त्रास वाहनधारकांसह शेतकऱ्यांना होत आहे. हा कचरा कऱ्हाड शहरासह विद्यानगर परिसरातील व्यावसायिक रात्रीच्या वेळी टाकत आहेत. कचरा पोत्यातून आणून टाकला जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

रिफ्लेक्टरची गरज

मलकापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.

सीसीटीव्हीचा ‘वॉच’ (फोटो : २३इन्फोबॉक्स०१)

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावातील मुख्य चौकात हालचालींवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जात आहे. या कॅमेऱ्यांच्या ऑपरेटिंगची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे.

वीजपुरवठा खंडित (फोटो : २३इन्फोबॉक्स०२)

पाटण : कृषिपंपाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्री-अपरात्री शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शिवारात जात असतात. वीज नसल्याने त्यांची निराशा होत आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.

Web Title: Movement on 'Sahyadri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.