भूमिपुत्रांना कायम नोकरी न दिल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:12+5:302021-09-14T04:45:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : ‘ज्या जिल्ह्यात कारखाने उद्योग आहेत. त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के जागा असा कायदा ...

भूमिपुत्रांना कायम नोकरी न दिल्यास आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन : ‘ज्या जिल्ह्यात कारखाने उद्योग आहेत. त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के जागा असा कायदा असताना या कायद्याचा विसर अनेक उद्योग कारखानदार मालकांना पडला आहे. यासाठी राज्यभर आंदोलन करून जनजागृती सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्र युवकांच्या रोजगारासाठी जिल्ह्यात लवकरच आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व आयटीयूचे उपाध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिला आहे.
अरबवाडी, ता. कोरेगाव येथील तानाजी गोळे व शहाजी शेठ गोळे परिवाराच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास ते बोलत होते.
यशवंत भोसले म्हणाले, ‘जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे हे माझं कर्तव्य आहे. तेरा वर्षांपूर्वी मी कोरेगाव तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला होता. यावेळी मला थोड्या फरकाने अपयश आले होते. पण त्याची कधीही चिंता न करता मी सातारा जिल्ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलो आहे.’
शहाजी गोळे यांनी स्वागत केले. तानाजी गोळे यांनी प्रास्ताविक केले.