शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; चितळी येथे बालिकेचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:33 IST

घरापर्यंत पोहोचलीच नाही.त्यानंतर मुलीचा शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह फॉर्म हाऊस जवळ असलेल्या विहिरी मध्ये आढळून आला. फॉर्मस हाऊस , कुटुंबाची वस्ती व विहीर या सर्वांमध्ये १०० ते २०० फुटाची फक्त आंतर आहे.दीक्षा इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होती.  नेमका या दीक्षा चा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कोणालाही सांगता येत नाही.

मायणी : चितळी तालुका खटाव येथे दीक्षा रामराव उबाळे ( वय १४ ) मूळ राहणार इटलापूर ता.जि.परभणी या बालिकेचा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली या घटनेमुळे मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती इटलापूर ता.जि.परभणी येथून मोलमजुरी करण्यासाठी रामराव मुरलीधर उबाळे हे पत्नी व तीन मुलांसह गत दोन वर्षांपूर्वी चितळी तालुका खटाव येथील  यशवर्धन पवार फार्म हाऊस आली आहे . 

रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान फॉर्मस हाऊस जवळच काम करत असलेल्या आई वडिलांना भेटून ही मुलगी माघारी घराकडे आली घरापर्यंत पोहोचलीच नाही.त्यानंतर मुलीचा शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह फॉर्म हाऊस जवळ असलेल्या विहिरी मध्ये आढळून आला. फॉर्मस हाऊस , कुटुंबाची वस्ती व विहीर या सर्वांमध्ये १०० ते २०० फुटाची फक्त आंतर आहे.दीक्षा इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होती.  नेमका या दीक्षा चा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कोणालाही सांगता येत नाही.

या घटनेची नोंद रविवारी सायंकाळी मायणी पोलीस सुरू केल्यानंतर या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कलेढोण येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला रात्री उशिरा या मुलीचा मृतदेह आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला .मुलगी दीक्षा चा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर या उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विकास जाधव करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसर