मोरणा-गुरेघर प्रकल्प हायजॅक

By Admin | Updated: June 27, 2016 00:40 IST2016-06-26T21:48:04+5:302016-06-27T00:40:50+5:30

साहित्य चोरीला : धनदांडग्यांचे पाणी साठ्यालगत बस्तान; प्रशासनाचे दुर्लक्ष

Motera-Gorehouse Project Hijack | मोरणा-गुरेघर प्रकल्प हायजॅक

मोरणा-गुरेघर प्रकल्प हायजॅक

पाटण : तालुक्यातील तारळी प्रकल्पानंतरचा सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून मोरणा-गुरेघरकडे पाहिले जाते. जवळपास २०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर झाला आहे. मात्र, आजची मोरणा प्रकल्पाची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्पाचे लाखोंचे साहित्य चोरीला गेले असून, धरणाच्या बॅक वाटरलगतच्या जमिनी काबिज करून धनदांडग्यांचे बस्तान बसले आहे.
मोरणा परिसरातील गोकूळ तर्फ पाटण, धावडे, शिद्रुकवाडी, आंब्रग, मोरगिरी, पेठशिवापूर, माणगाव, नाटोशी, वाडीकोतावडे, कुसरुंद, सुळेवाडी, आंबु्रळे, आडदेव, बेलीवडे, गव्हाणवाडी तसेच कऱ्हाड तालुक्यातील साजूर, तांबवे, पर्र्यंतची गावे अशा सुमारे ५० गावांना
मोरणा-गुरेघर प्रकल्पाचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत आहे.
उन्हाळ्यात मोरणा-गुरेघर प्रकल्पातील पाणी हे लोकांना नवसंजिवनी देणारे ठरले. तरीसुद्धा या प्रकल्पाकडे कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने मोरणा प्रकल्पावर दादागिरी, अवैध मासेमारी, चोऱ्या करणे असे प्रकार सुरू आहेत. प्रकल्पाचे चॅनल, लोखंडी अ‍ॅँगल व यांत्रिकी साहित्य बिनधास्त चोरून नेले. त्याची विक्री करून लाखो रुपये कमविले.
यामध्ये प्रकल्पाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात आहे. स्थानिक लोक दादागिरी करतात. प्रकल्पावर ओल्या पार्ट्या करतात. पाणीसाठ्यात उतरून मासेमारी करतात. तसेच ठेकेदारांच्या कार्यालय व साहित्य ठेवण्याच्या स्टोअररूममध्ये जाऊन चोऱ्या करणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)

अधिकारी पुणे-मुंबईला
मोरणा-गुरेघर प्रकल्पावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी सतत सातारा, पुणे, मुंबईत असल्याचे सांगतात; मग मोरणा प्रकल्पाकडे यायला यांना वेळ कधी मिळणार? एक अधिकारी तर मी मंत्रालयात आहे, मीटिंगमध्ये आहे, असे सांगतात. अधिकाऱ्यांचे या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लण झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Motera-Gorehouse Project Hijack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.