माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

By Admin | Updated: May 19, 2015 00:31 IST2015-05-18T22:18:54+5:302015-05-19T00:31:12+5:30

दुष्काळावर मात : खटाव तालुक्यातून मागणीच नाही

Most dams in Manna dam | माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

सातारा : सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी असून, दरवर्षीच पाण्याची टंचाई भेडसावते. यावर्षीही पाण्याची टंचाई असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी बोअरवेलची मागणी ग्रामपंचायतीतून होते. यावर्षी टंचाईग्रस्तमधून ३७ विंधनविहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ३२ मारल्या असून, त्यातील ३० विंधनविहिरींना पाणी लागले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात सर्वात जास्त विंधनविहिरींची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे एक तर भाड्याची सात विंधन यंत्रे आहेत.सातारा जिल्ह्यात नेहमीच माण, खटाव, कोरेगाव, फलटण या पूर्व भागातील तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवते. पश्चिम भागातील सातारा, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे डोंगरी तालुके असून, या तालुक्यांमध्येही उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.प्रामुख्याने पूर्व भागातील तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी विंधन विहिरींचीही मागणी होती. टंचाईच्या आराखड्यातून ग्रामपंचायतीकडून मागणी पंचायत समितीकडे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या तीन भूवैज्ञानिकांकडून मागणी केलेल्या गावामध्ये प्रस्तावित जागेची पाहणी करून पाणी आहे किंवा नाही, याची तपासणी यंत्रणेद्वारे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडून विंधनविहिरीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर बोअरवेल मारण्यात येते, असे यांत्रिकी विभागातून सांगण्यात आले. यावर्षी सर्वात जास्त माणमधून बोअरवेलची मागणी झाली आणि मंजुरीही मिळाली. एकट्या माण तालुक्यात मारलेल्या २१ बोअरवेलपैकी १८ बोअरवेलला पाणी लागले असून, तीन बोअरवेल अयशस्वी झाल्या. खटाव तालुक्यात एकही बोअरवेलची मागणी झाली नाही. मारलेल्या ३२ बोअरवेलपैकी केवळ तीन बोअरवेल अयशस्वी ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)

बोअरवेलची सध्य स्थिती--तालुकामंजूर बोअरवेल मारलेल्या बोअरवेल

माण २६ २१
कोरेगाव १ १
फलटण ८ ८
पाटण २ २

Web Title: Most dams in Manna dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.