सताऱ्यात पाटबंधारेचा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या 'जाळ्यात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 16:37 IST2017-08-17T16:32:08+5:302017-08-17T16:37:12+5:30
सातारा : कण्हेर पाटबंधारे शाखा क्रमांक 3 चे कालवा निरीक्षक शिवाजी हणमंत कदम (वय ५७, सध्या रा.संगमनगर, सातारा) याला १० हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

सताऱ्यात पाटबंधारेचा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या 'जाळ्यात'
सातारा : कण्हेर पाटबंधारे शाखा क्रमांक 3 चे कालवा निरीक्षक शिवाजी हणमंत कदम (वय ५७, सध्या रा.संगमनगर, सातारा) याला १० हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतजमिनीजवळून नदीचे पाणी जात असल्याने त्यांना पाण्याचा परवाना पाहिजे होता. याकामासाठी तक्रारदार हे गोजेगावमधील कण्हेर पाटबंधारे शाखा क्रमांक 3 च्या कार्यालयातील कालवा निरीक्षक शिवाजी कदम याला भेटले. बुधवारी भेटल्यानंतर कदम याने त्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.
तक्रार आल्यानंतर एसीबी विभागाने त्याबाबत पडताळणी केली असता लाचेची मागणी झाली असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी दि. १७ रोजी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा रचला. कदम कार्यालयात असताना त्याने लाचेचे १० हजार ३०० रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडले. एसीबीचा ट्रॅप झाल्यानंतर कदम गडबडून गेला. कारवाईनंतर ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिवाजी कदम याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.