शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयनेला ३१ मिलीमीटर पाऊस; धरणात १५ टीएमसी साठा

By नितीन काळेल | Updated: June 14, 2024 19:27 IST

धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही

सातारा : जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ४५ मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला ३१ आणि महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला. गतवर्षीपेक्षा यंदा या ठिकाणी पाऊस अधिक झाला आहे, तर कोयना धरणात १५ टीएमसी साठा शिल्लक आहे. धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही.जिल्ह्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाले. त्यामुळे मागील बुधवारपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील सहा महिने दुष्काळी झळा सोसणाऱ्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातही पावसाने चिंब करून सोडले आहे. यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहिले, तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. परिणामी, खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे, तर आतापर्यंत दुष्काळी तालुक्यात गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे.

सध्या जमिनीला वापसा येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. भात खाचरातही पाणी साचले आहे. त्यामुळे भात लागणीला वेग येऊ लागला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे झाला आहे. १ जूनपासून नवजाला २७३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, तर कोयनानगर येथे आतापर्यंत २१२ आणि महाबळेश्वरला २१३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५.०५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. पाऊस होत असला, तरी धरणात अजून आवक सुरू झालेली नाही, तसेच शुक्रवारीही पश्चिम भागात पाऊस झाला, तर सातारा शहरात सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.

मागील वर्षी महाबळेश्वरला फक्त ७५ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्यात या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, सतत पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच अधिक पाऊस पडल्याचे दिसून आलेले आहे. गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत काेयनानगर येथे ४१ मिलीमीटर पाऊस झाला होता, तर नवजाला ४५ आणि महाबळेश्वर येथे ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी कोयना धरणात १२.०८ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानKoyana Damकोयना धरण