शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह मान्सून दाखल, वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध

By नितीन काळेल | Updated: June 12, 2023 13:19 IST

सातारा शहरात मान्सून दाखल झाल्याने नागरिकांची चिंता मिटली

सातारा : तो केव्हा येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या सातारावासियांसाठी सोमवार चिंता दूर करणारा दिवस ठरला. कारण, उशिरा का असेना मान्सून दाखल झाला. दुपारी पावणे एकच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाची सर कोसळली. यावेळीच वीजपुरवठाही खंडित झाला होता.जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पण, यंदा हवामान बदलाच्या कारणाने मान्सूनने ओढ दिली होती. त्यामुळे ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागलेली. त्यातच उन्हाळी पाऊसही मोठ्या प्रमाणात नसल्याने ओढे कोरडे पडले आहेत. तलाव आटू लागले असून धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाची आस सर्वांनाच होती. असे असतानाच रविवारी तळकोकणात मान्सून दाखल झाल्याचा सांगावा आल्याने जिल्हावासीयांची चिंता कमी झाली होती. कारण, एक-दोन दिवसांत मान्सून जिल्ह्यात दाखल होईल, असा अंदाज होता. हा अंदाज आता खरा होताना दिसून येत आहे.

सातारा शहराबरोबरच पश्चिम भागातील वातावरण सोमवारी सकाळपासूनच बदलले होते. ऊन कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झालेले. तर दुपारी १२ च्या सुमारास अंधारून आले होते. त्यानंतर पावणे एकच्या सुमारास जोरदार वारा सुटला. झाडे हलू लागली तसेच घरावरील पत्र्यांचा आवाज येऊ लागला. त्यानंतर पावसाची जोरदार सर पडली. यामुळे सातारकरांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले. तर या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार घडला.दरम्यान, सातारा शहरात मान्सून दाखल झाल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. आता दमदार पाऊस पडावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. मान्सून दाखल झाला असलातरी दमदार पाऊस पडला तरच पेरणी वेळेवर होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस