पिवळ्या गाडीवरच हल्ला करतं वानर !
By Admin | Updated: December 23, 2014 23:46 IST2014-12-23T21:56:03+5:302014-12-23T23:46:40+5:30
वडगाव हवेली : महिलांसह मुलांवरही हल्ले

पिवळ्या गाडीवरच हल्ला करतं वानर !
वडगांव हवेली : माणसाप्रमाणेच पशु-पक्ष्यांमध्येही भावभावना, प्रेम आणि राग असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. वडगाव हवेली येथेही एक वानर आपला राग व्यक्त करताना ग्रामस्थांना दिसून येत आहे. संबंधित वानराकडून फक्त स्कुूल बसचाच पाठलाग केला जात असून बस दृष्टीआड होईपर्यंत ते धावत असल्यचे पहावयास मिळत आहे.
गत महिन्याभरापासून गावामध्ये एका वानराचा वावर आहे़ सुरूवातीला हे वानर कऱ्हाड-तासगाव मार्गालगत वडगाव हवेली फाट्यानजीकच्या झाडावर ग्रामस्थांना दिसून येत होते. मात्र, काही दिवसांनी त्याचा गावातही वावर सुरू झाला. शाळेचे विद्यार्थी घेवून जाणाऱ्या स्कूल बसला लक्ष करून हे वानर द्वेषाने त्या बसचा पाठलाग करीत आहे. साधारणत: पिवळ्या रंगाची स्कूल बस किंवा एस़ टी़ गावामध्ये आली की ते त्याच्या पाठीमागून धावते. बसवर बसून ते खिडकीच्या काचेवर हाताने मारते़ तर कधी एस़ टी़ च्या व स्कूलबसच्या पुढे येवून बसते. अशा वेळी चालकाला गाडी पुढे नेता येत नाही़ त्यावेळी बसमधील प्रवासी व विद्यार्थी घाबरून जातात़ स्कूलबस पूर्णपणे बंदिस्त असल्याने काही धोका नसतो़ मात्र, बसचा पाठलाग करताना त्याच्याकडून धोका निर्माण होत असल्याने महिला व मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वानराचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे़ (वार्ताहर)
वनविभागालाही सापडेना
काही दिवसांपूर्वी वानराने काही महिला व शाळकरी मुलांना मारहाण करून जखमी केले. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ग्रामपंचायतीकडून वनविभागाकडे तक्रार देण्यात आली आहे़ तक्रारीची दखल घेवून वनविभागानेही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले.