उमेदवार ठरविण्यासाठी महाडिक गटाची सोमवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:29+5:302021-05-30T04:30:29+5:30

इस्लामपूर : भाजपचे नेते राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंचे इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील प्रत्येक गटात कार्यकर्ते आहेत. त्यातील ‘कृष्णे’साठी ...

Monday meeting of Mahadik group to decide the candidate | उमेदवार ठरविण्यासाठी महाडिक गटाची सोमवारी बैठक

उमेदवार ठरविण्यासाठी महाडिक गटाची सोमवारी बैठक

इस्लामपूर : भाजपचे नेते राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंचे इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील प्रत्येक गटात कार्यकर्ते आहेत. त्यातील ‘कृष्णे’साठी इच्छुक कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून पेठ नाका येथे संपर्कात आहेत. महाडिक बंधूंनी अद्याप कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. सोमवार (दि. ३१ मे) रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे राहुल महाडिक यांनी सांगितले.

महाडिक गटाची नेर्ले-तांबवे गटात कार्यकर्त्यांची फळी आहे. सहकार पॅनलकडून नेर्लेतील संजय नारायण पाटील, विद्यमान संचालक गिरीश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांच्या घरातील महिला इच्छुक आहेत. त्यांचे काही कार्यकर्ते इतर गटांकडूनही इच्छुक असल्याचे दिसते. नेर्लेतील उमेदवार निवडणे हे महाडिक बंधूंना आव्हान आहे.

बोरगाव-रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र या गटातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्तेही उमेदवारी मिळण्यासाठी तिन्ही गटांकडे संपर्क साधून आहेत. परंतु, उमेदवार निवडीचे आव्हान असून, सर्वच कार्यकर्त्यांची सोमवारी (दि. ३१) रोजी बैठक घेऊन उमेदवारी निवडीचा निर्णय घेणार असल्याचे महाडिक बंधूंनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Monday meeting of Mahadik group to decide the candidate