विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 13, 2015 23:56 IST2015-06-13T23:56:33+5:302015-06-13T23:56:33+5:30
मायलेकींना जातीवाचक शिवीगाळ

विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
फलटण : ‘स्वस्त धान्य का दिले नाही, याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चिडून मायलेकींना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. १२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जाब विचारल्याच्या कारणावरुन चाळीस वर्षीय महिला व तिच्या मुलीला शामराव कोंडिबा तरडे, बापूराव कोंडिबा तरडे, दशरथ कोंडिबा तरडे व जनाबाई तरडे यांनी हात, लाथाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केला.
त्यानंतर बापूराव तरडे हा संबंधित महिलेच्या घरात गेला. तिच्या पतीलाही मारहाण करत रॉकेल ओतून घर पेटवून देण्याची धमकी दिली. (प्रतिनिधी)